मध्य रेल्वे मार्गावरील पहिली एसी लोकल ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर धावणार आहे. त्यामुळं प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे. अशातच नवीन वर्षांत दाखल होणाऱ्या आणखी ५ लोकलचं वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ३ एसी लोकल चालवण्याचं नियोजन सुरू असून या लोकलच्या २७ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वे मुख्यालयाकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर एकूण ६ एसी लोकल येणार आहेत. त्याचप्रमाणं ट्रान्स हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या अप मार्गावर आठ आणि डाऊन मार्गावर आठ अशा १६ फेऱ्या दिवसभरात होणार आहे. यामधील काही फेऱ्या गर्दीच्या वेळीही आहेत.
मार्च महिन्यापर्यंत आणखी एक लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार आहे. तर उर्वरित ४ लोकल डिसेंबपर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल होणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकलचं वेळापत्रक तयार असतानाच सीएसएमटी ते पनवेल हार्बर आणि सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गाचंही वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
हार्बरवरही एकच लोकल चालवताना त्याच्या अप मार्गावर ७ आणि डाऊन मार्गावर ६ फेऱ्या होणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर ३ एसी लोकल चालवण्याचं नियोजन करण्यात आल असून, त्यांच्या २७ फेऱ्या होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये डाऊन मार्गावर १५ आणि अप मार्गावर १२ फेऱ्या होणार आहेत.
हेही वाचा -
अखेर कांद्याचे दर उतरले; प्रतिकिलो ६५ रुपये
नवीन बांधकामांना बायोगॅस प्रकल्प उभारणं सक्तीचं