अखेर कांद्याचे दर उतरले; प्रतिकिलो ६५ रुपये

कांद्याच्या दरात घसरण व्हायला सुरूवात झाली आहे.

SHARE

मागील अनेक दिवस पिकांच्या नुकसानामुळं काद्यांचे दरात तुफान वाढ झाली होती. बाजारात प्रतिकिलो कांदा १५० रुपये झाल्यानं खरेदी करायचा का नाही असा प्रश्न ग्राहकांना सतावत होता. मात्र, आता कांद्याच्या दरात घसरण व्हायला सुरूवात झाली आहे. कांद्याचे दर ४ ते ५ दिवसांत निम्म्यावर येऊन ठेपले आहेत.

कांद्याचा वापर कमी

कांद्याचे दरात वाढ झाल्यानं हॉटेल, खानावळीतूनही कांद्याचा वापर कमी झाला. त्यामुळँ ग्राहकांसह छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. परंतु, लवकरच हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे

कांद्याकडं पाठ

चढ्या दरामुळं ग्राहकांनी कांद्याकडं पाठ फिरवली. त्याचा परिणाम म्हणून आता दर उतरत आहेत. कांद्याचा गेल्या शुक्रवारी १० किलोला १२०० रुपये असलेला दर घसरून आता ५०० ते ६५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळं आता कांदा प्रतिकिलो ४० ते ६५ रुपये दराने मिळत आहे. भाववाढ होण्याऐवजी घसरण सुरू झाली. सध्या हेच भाव कायम राहतील. ख्रिसमस व नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कांद्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

नवीन बांधकामांना बायोगॅस प्रकल्प उभारणं सक्तीचं

पानिपत चित्रपटातील 'त्या' सीनवर कात्रीसंबंधित विषय
ताज्या बातम्या