मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर दरड कोसळली

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • परिवहन

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील बोरघाटात सकाळी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक धिमी झाली होती. स्थानिक रस्ते वाहतूक प्रशासनाने दरड बाजूला काढून ही वाहतूक पूर्वपदावर आणली.

विकेंडला वाहतूककोंडी

पावसाळा म्हटलं की दरवर्षी पावसाळ्यात विकेंडला मजा-मस्ती करण्यासाठी आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची लोणावळा येथील भूशी डॅम येथे मोठ्या प्रमामात गर्दी होते. मात्र, दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या २ लेन बंद झाल्या होत्या. त्यामुळे मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

जाळ्या बसवल्या तरीही...

मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएमआरडीसी) मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील धोकादायक दरडी काढून त्यावर जाळ्या बसवण्याचं काम हाती घेतलं होतं.

प्रवाशांमध्ये चिंता

त्यानुसार ३१ जानेवारीपासून कामालाही सुरुवात करण्यात आली होती. मात्र, एमएमआरडीसी काम केलं असतानाही दरडी कोसळ्याने सर्व प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे.


हेही वाचा-

आषाढी एकादशीनिमित्त ३७८१ जादा एसी बस

ठाण्यातील सॅटीस पुलावर २ एसटींची टक्कर, २८ प्रवासी जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या