Advertisement

ठाण्यातील सॅटीस पुलावर २ एसटींची टक्कर, २८ प्रवासी जखमी


ठाण्यातील सॅटीस पुलावर २ एसटींची टक्कर, २८ प्रवासी जखमी
SHARES

ठाणे स्टेशन परिसरातील सॅटीस पुलावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)च्या २ बसगाड्यांची समोरासमोर टक्कर होऊन त्यात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना त्वरीत ठाण्याच्या सिव्हील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती एसटीच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.


कधी घडली घटना?

दुपारी दीडच्या दरम्यान ठाणे-भिवंडी आणि ठाणे-कल्याण या दोन एसटी बसगाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटीस (Station Area Traffic Improvement Scheme) पुलावर हा अपघात झाला असून या दोन्ही बसमधील एकूण २८ जण जखमी झाले आहेत.


गंभीर दुखापत नाही

दरम्यान ठाणे सिव्हील रूग्णालयाशी संपर्क साधला असता आतापर्यंत १२ प्रवाशांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं रूग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. तर उपचारासाठी दाखल झालेल्या प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचंही रूग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा