आता बेस्टही करणार टिव टिव..!

रेल्वेप्रमाणे आता बेस्टच्या प्रवाशांनाही प्रशासनाकडं तक्रार करता येणार असून बेस्टच्या सर्व निर्णयांची माहिती मिळणार आहे. यासाठी ट्विटरवर बेस्टनं MyBESTBus आणि MyBESTElectric या नावानं ट्विटर हॅण्डल सुरू केलं आहे. त्यामुळं प्रवाशांना बेस्टच्या संपाबाबत तसंच, निर्णयांबाबत सहज महिती मिळणार आहे.

घटनेची माहिती ट्विटरवर

मुंबईत घडणाऱ्या कोणत्याही घटनेची माहिती ट्विटरवर संबंधित प्रशासनाच्या हॅण्डल सर्च केल्यास मिळते. मात्र, बेस्टनं घेतलेले निर्णयांची माहिती प्रवाशांना मिळत नाही. सध्या महापालिकेनं मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी ट्विटरवर हॅण्डल सुरू केलं आहे.

प्रतिसाद मिळणार का?

महापालिकेच्या या ट्विटर हॅण्डलला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच, प्रवाशांनी केलेल्या तक्ररींची दखलही घेतली जात आहे. त्यामुळं बेस्टच्या ट्विटर हॅण्डलला सामान्यांचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा -

‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या’, शालिनी ठाकरेंचं महापौरांना पत्र

रेल्वे तिकीट आरक्षण करणं महाग, २० ते ४० रुपये सेवाशुल्क लागणार


पुढील बातमी
इतर बातम्या