ट्रान्स हार्बरवर प्रवाशांना लोकलच्या प्रथम दर्जा डब्यातून प्रवास करण्याची मुभा

ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकल लवकरच धावणार आहे. या एसी लोकलमुळं साध्या लोकलची संख्या कमी होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनानं साध्या लोकलमधील प्रथम दर्जाच्या एका डब्यामध्ये द्वितीय दर्जाच्या प्रवाशांना प्रवास करू देण्याची मुभा देण्याची तयारी करत आहे. त्यामुळं एसी लोकल सुरू झाल्यानंतर द्वितीय दर्जाच्या प्रवाशांना तुलनेनं कमी त्रास होईल.

एसी लोकल

मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल ट्रान्स हार्बरवर चालवण्यात येणार आहे. एसी लोकल चालवण्यासाठी अतिरिक्त मार्गिका नाही. त्यामुळं एक साधी लोकल रद्द करून त्याजागी एसी लोकल चालवण्यात येणार आहे. या साध्या लोकलमधील प्रवाशांना अन्य लोकलमधील प्रथम दर्जाच्या एका डब्यात द्वितीय वर्गातील प्रवाशांना प्रवास करू देण्याची मुभा देण्याबाबत नियोजन केलं जात आहे.

हेही वाचा - मुंबई विमानतळ ते पुणे मार्गावर धावणार शिवनेरी?

२६२ फेऱ्या

सध्या ठाणे-वाशी, नेरुळ, पनवेल, बेलापूर या ट्रान्स हार्बरवर सध्या २६२ फेऱ्या धावत आहेत. सामान्यत: १२ डब्यांच्या लोकलमध्ये प्रथम दर्जाचे ३ आणि द्वितीय दर्जाचे ९ डबे असतात. प्रथम दर्जाच्या एका डब्यांमध्ये द्वितीय दर्जाच्या तिकीट-पास धारकांना प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर प्रथम दर्जाचे उर्वरित २ डबे कायम राहणार आहेत. द्वितीय वर्गाच्या डब्यातील प्रवाशांना एक अतिरिक्त डबा मिळणार आहे.


हेही वाचा -

महिला प्रवाशांसाठी ‘तेजस्विनी’ लवकरच धावणार

लोकलवर फेकलेल्या वस्तूमुळं प्रवासी जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या