लोकलवर फेकलेल्या वस्तूमुळं प्रवासी जखमी

मध्य रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलवर लोखंडी वस्तू फेकल्यामुळं एक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

SHARE

मध्य रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलवर लोखंडी वस्तू फेकल्यामुळं एक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. विनय कटारे असं या प्रवाशाचं नाव असून, मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. विनय हा मुंबईहून बदलापूरच्या दिशेनं प्रवास करत असताना हा प्रकार घडला. मात्र, अद्याप लोकलवर लोखंडी वस्तू भिरकावलेल्याचं माहिती अस्पष्ट आहे. तसंच, या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

खासगी कंपनीत कार्यरत

विनय हा कळवा येथील खासगी कंपनीत कार्यरत आहे. मंगळवारी काम संपल्यावर विनय यांनी घरी जाण्यासाठी संध्याकाली ७ वाजताच्या सुमारास डोंबिवली स्थानकात लोकल बदलून बदलापूर लोकल पकडली होती. लोकल बदलापूरला येत असताना पावणे आठच्या सुमारास बेलवली येथील नाल्याशेजारील भागातून आलेली एक लोखंडी वस्तू दारात उभ्या असलेल्या विनय यांच्या हाताला लागून गेली. 

हेही वाचा - शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या कामात तब्बल 'इतके' कर्मचारी


हाताला गंभीर दुखापत

या घटनेत विनय यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बदलापुरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या हाताला १५ टाके पडल्याची माहिती मिळते. दरम्यान, याआधी मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानक परिसरात असाच प्रकार घडला होता.हेही वाचा -

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ही गोड बातमी भाजपच देईल - संजय राऊत

आलियाचा हॉट अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल Wow


संबंधित विषय
ताज्या बातम्या