Advertisement

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ही गोड बातमी भाजपच देईल - संजय राऊत

राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होणार, लवकरच गोड बातमी मिळणार असं म्हणणाऱ्या भाजपला टोला हाणत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ही गोड बातमी भाजपकडूनच मिळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ही गोड बातमी भाजपच देईल - संजय राऊत
SHARES

राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होणार, लवकरच गोड बातमी मिळणार असं म्हणणाऱ्या भाजपला टोला हाणत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ही गोड बातमी भाजपकडूनच मिळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ गुरूवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करणार असल्याची माहिती कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जनतेने भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीला कौल दिल्याने राज्यात महायुतीचंच सरकार येणार असं आश्वासनही मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या होकाराआधी देऊन टाकलं.

हेही वाचा- सरकार स्थापनेवर शरद पवार यांचं मोठं विधान, शिवसेनेला धक्का?

त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, राज्यात सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपने पुढं येऊन सत्तास्थापनेसाठी दावा करावा, हेच आमचं देखील म्हणणं आहे. भाजपने राज्यपालांना भेटून १४७ आमदारांचा आकडा देऊन सत्तास्थापनेचा दावा केल्यास आम्हालाही आनंदच होईल.



हेही वाचा- 

शिवसेनेच्या होकाराशिवाय भाजप राज्यपालांना भेटणार, पण चर्चा प्रदेशाध्यक्ष बदलाचीच

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये २ गट? दलवाईंनी घेतली राऊतांची भेट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा