Advertisement

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये २ गट? दलवाईंनी घेतली राऊतांची भेट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रभादेवीतील सामना कार्यालयात बुधवारी दुपारी भेट घेतली.

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये २ गट? दलवाईंनी घेतली राऊतांची भेट
SHARES

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी फारशा उत्सुक नसल्या, तरी काँग्रेसमधील एका गटाचा शिवसेनेला पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रभादेवीतील सामना कार्यालयात बुधवारी दुपारी भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना आणखी उधाण आलं.

भाजपला कुठलाही नवा प्रस्ताव देणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील निम्मा वाटा मिळावा यासाठी शिवसेना अजूनही ठाम आहे. भाजप सरकार स्थापनेसाठी दावा करणार नसेल, तर शिवसेना पुढाकार घेईल, असं म्हणणारे राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.  

हेही वाचा- राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला प्रस्ताव सादर?

तर, त्यानंतर थोड्याच वेळात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिलेला असल्याने त्यांनीच सरकार स्थापन करावं. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातच बसणार असल्याचं स्पष्ट केलं. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब विखे यांनीही भाजपने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला पाहीजे असं म्हटलं. 

परंतु काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांची सकाळी भेट घेऊन चर्चा केल्यामुळे काँग्रेसच्या एका गटाचा शिवसेनेला पाठिंबा असल्याची चर्चा रंगली.  त्यातच दुपारी हुसेन दलवाई यांनी राऊत यांची भेट घेतल्यानंतर तर या चर्चेला आणखीच हवा मिळाली. 

कुठल्याही परिस्थितीत राज्यात भाजपचं सरकार येऊ नये अशी आपली इच्छा असून अंतिम निर्णय सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी घ्यावा, असंही दलवाई यांनी सुचवलं आहे. 



हेही वाचा-

सरकार स्थापनेवर शरद पवार यांचं मोठं विधान, शिवसेनेला धक्का?

शिवसेनेला काँग्रेसकडून धक्का? अहमद पटेल यांनी घेतली गडकरींची भेट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा