Advertisement

राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला प्रस्ताव सादर?

राज्यातील अस्थिर स्थितीबद्दल चिंता व्यक्त करतानाच लवकरात लवकर नवं सरकार यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटत असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं.

राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला प्रस्ताव सादर?
SHARES

राज्यातील अस्थिर स्थितीबद्दल चिंता व्यक्त करतानाच लवकरात लवकर नवं सरकार यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटत असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं. पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राऊत यांनी बुधवारी सकाळी पवार यांची भेट घेतली. केवळ १० मिनिटांत ही भेट आटोपली. त्यानंतर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही केवळ सदिच्छा भेट होती. या भेटीत शरद पवार यांच्यासोबत राजकीय विषयावर चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी राज्यातील अस्थिर स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच राज्यात लवकर नवं सरकार यावं अशी अपेक्षाही व्यक्त केली.

हेही वाचा- सरकार महायुतीचंच येणार, भाजपला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा

जनतेने आम्हाला विरोधी पक्षांत बसण्याचा कौल दिल्याचंही पवार यांनी नमूद केल्याचं राऊत यावेळी म्हणाले. या भेटीनंतर राऊत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वांद्र्यातील ‘मातोश्री’कडे रवाना झाले. याआधी भाजपला कुठलाही प्रस्ताव पाठवणार नसल्याचंही राऊत म्हणाले होते. 

शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्यात नवा पर्याय देता येऊ शकेल, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार राऊत यांनी पवार यांची भेट घेऊन हा प्रस्ताव तर सादर केला नाही ना? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. 



हेही वाचा-

‘नवा प्रस्ताव ना येणार ना जाणार’ - संजय राऊत

कसला प्रस्ताव, जे ठरलंय ते करा, संजय राऊत यांनी पुन्हा ठणकावलं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा