Advertisement

‘नवा प्रस्ताव ना येणार ना जाणार’ - संजय राऊत

. निवडणूकीपूर्वीच पुढची समीकरण ठरल्यामुळे प्रस्तावाचा संबधच येत नाही. त्यामुळे कुठलाही ‘नवा प्रस्ताव ना येणार ना जाणार’ ठरलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना जो फॉर्म्युला ठरला होता त्यावरच चर्चा केली जाईल.

‘नवा प्रस्ताव ना येणार ना जाणार’ - संजय राऊत
SHARES

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकींचा निकाल लागून १२ दिवस उलटले तरी ही सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेत कलगीतुरा कायम आहे. सत्ता संघर्षावरूनचा वाद दिवसेंदिवस चिघळत जात असताना. बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ‘कुठलाही प्रस्ताव जाणार नाही किंवा येणार नाही, दिलेल्या शब्दावरच युती होईल, असे म्हणत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शिवसेना कायम असून त्यांची भूमिका ठाम असणार असल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणूकीला स्वतः अमित शहा यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांची मनधरणी करत युती केली. त्यावेळी शहा यांच्या समक्ष मुख्यमंत्र्यांनी या पुढील निवडणूका या ५०-५० च्या फॅर्म्यूलाने लढणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहिर केले होते. या ५०-५० च्या फॅर्म्यूल्यात समसमान जागा वाटप आणि पदभार हे निश्चित करण्यात आले होते. त्या शब्दावर विधानसभेला एकत्र लढलो. त्यात ही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची अडचण लक्षात घेऊन कमी जागांचा प्रस्ताव स्विकारला. मात्र निवडणूकीनंतर दिलेल्या शब्दावर मुख्यमंत्री ठाम नाहीत. निवडणूकीपूर्वीच पुढची समीकरण ठरल्यामुळे प्रस्तावाचा संबधच येत नाही.  त्यामुळे कुठलाही ‘नवा प्रस्ताव ना येणार ना जाणार’ ठरलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना जो फॉर्म्युला ठरला होता त्यावरच चर्चा केली जाईल अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमिवर राजकिय घडामोडींना वेग आला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा