Advertisement

शिवसेनेला काँग्रेसकडून धक्का? अहमद पटेल यांनी घेतली गडकरींची भेट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या दोघांनी तासभर चर्चा केली. या भेटीत शिवसेनेच्या प्रयत्नांना ब्रेक लावण्याविषयी चर्चा झाल्याचे तर्क लावले जात आहेत.

शिवसेनेला काँग्रेसकडून धक्का? अहमद पटेल यांनी घेतली गडकरींची भेट
SHARES

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या दोघांनी तासभर चर्चा केली. या भेटीत शिवसेनेच्या प्रयत्नांना ब्रेक लावण्याविषयी चर्चा झाल्याचे तर्क लावले जात आहेत. 

पटेल हे सोनिया गांधीचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेसचे अनेक निर्णय पटेल यांच्याच सल्ल्याने होतात. तर नितीन गडकरी महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या भेटीत महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- आमचे आमदार फोडूनच दाखवा, भाजपला खुलं चॅलेंज

भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसेल, तर शिवसेना त्यासाठी पुढाकार घेईल, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन करेल आणि काँग्रेस बाहेरुन पाठिंबा देईल, असं गणित मांडलं जात आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. परंतु शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया फारशा उत्सुक नसल्याचं म्हटलं जात आहे. 

त्यातच पटेल गडकरींच्या भेटीला गेल्याने भाजपची राज्यातील गणिते अधिक सोपी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचा पाठिंबा न मिळाल्यास आणि राष्ट्रवादीनेही विरोधी पक्षात बसण्याचा सूर आळवल्यास शिवसेना बॅकफूटवर येऊ शकते.

हेही वाचा-

राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला प्रस्ताव सादर?

‘नवा प्रस्ताव ना येणार ना जाणार’ - संजय राऊत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा