शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या कामात तब्बल 'इतके' कर्मचारी

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूची एकूण लांबी २२ किमी आहे. हे काम वेळेवर पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यामुळे एमएमआरडीने मोठं मनुष्यबळ वापरलं आहे.

SHARE

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं काम सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. हे काम वेळेवर पूर्ण होण्यासाठी एमएमआरडीएने तब्बल ५ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचं १४ टक्के काम पूर्ण झालं आहे.

१७ हजार ८४३ कोटी रुपये खर्च असलेल्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूची एकूण लांबी २२ किमी आहे. हे काम वेळेवर पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यामुळे एमएमआरडीने मोठं मनुष्यबळ वापरलं आहे. या प्रकल्पात ५ हजार कर्मचारी काम करत आहेत. यापैकी ४३०० कर्मचारी हे कुशल आणि अकुशल आहेत. तर ७०० तांत्रिक अभियंते आहेत.

मार्च २०१८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला तीन टप्प्यांमध्ये सुरुवात झाली. या प्रकल्पामध्ये वाहनांसाठी सहा लेन असणार आहेत. तर एक अतिरिक्त लेन आपत्कालीन व्यवस्थेसाठी असणार आहे. दोन्ही बाजूंकडील जमिनीवरील पुलाची लांबी एकूण ५.५ किलोमीटर असून खाडीवरील पुलाची लांबी १६.५ किमी आहे.  या पुलावरून ताशी शंभरच्या वेगाने प्रवास करता येणार आहे.हेही वाचा -

मेट्रो ३ प्रकल्पाच्या ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ पूर्ण

वांद्रे-कुर्ला संकुलास जोडणाऱ्या उन्नत मार्गाचं काम लवकरच होणार पुर्ण
संबंधित विषय
ताज्या बातम्या