Advertisement

मेट्रो ३ प्रकल्पाच्या ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ च्या मार्गावरील ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ वा भुयारी टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने दिली.

मेट्रो ३ प्रकल्पाच्या ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ पूर्ण
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ च्या मार्गावरील ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ वा भुयारी टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने दिली.

पॅकेज सहामधील विद्यानगरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी १ स्थानकादरम्यान डाऊन लाइनच्या दिशेने २.८ किमीचं अंतर २ हजार ४८ रिंग्जच्या मदतीने टनेल बोरिंग मशिनद्वारे पूर्ण करण्यात आलं. 

हेही वाचा- मेट्रो कारशेडसाठी रातोरात कापली आरेतील झाडं, स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक

याआधी सूर्या २ टनेल बोरिंग मशिनच्या मदतीने मेट्रो ३ च्या विधानभवन ते चर्चगेट स्थानकांदरम्यान डाऊन लाइनच्या दिशेने ४८२ किमीचं अंतर ९० दिवसांत पूर्ण करण्यात आलं होतं. २२ आॅक्टोबर रोजी २१ वा भुयारी टप्पा पार करण्यात आला होता. तर १२ आॅक्टोबर रोजी मेट्रो ३ चं ६५ टक्के भुयारीकरण पूर्ण करण्यात आलं होतं.

  • नया नगर ते धारावी स्थानकांदरम्यान ५९० मी. भुयारीकरणाचा २० वा टप्पा पूर्ण, कृष्णा २ टनेल बोरिंग मशिनची मदत
  • विधान भवन ते चर्चगेट दरम्यान ४९९ मी. भुयारीकरणाचा १९ वा टप्पा ३ आॅक्टोबरला पूर्ण सूर्या १ टनेल बोरिंग मशिनची मदत

हेही वाचा-

मेट्रोसाठी आणखी ३०० झाडं कापली जाणार

मेट्रो ३ च्या स्थानकांचा आराखडा बनवणार इंजिनिअरिंगचे ९५ विद्यार्थीसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा