Advertisement

मेट्रोसाठी आणखी ३०० झाडं कापली जाणार


मेट्रोसाठी आणखी ३०० झाडं कापली जाणार
SHARES

कुलाबा ते सिप्झ या ‘मेट्रो ३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरेतील २५०० झाडे कापण्याला महापालिकेनं परवानगी दिली. मात्र, या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आरे कॉलनी परिसरात पर्यावरणप्रेमींसह अनेकांनी आंदोलन केलं. असं असताना आता डी. एन. नगर ते दहिसर या ‘मेट्रो २ ए’ मार्गासाठी तब्बल ३०० झाडं काढावी लागणार आहेत. अंधेरी आणि कांदिवली, दहिसरमधील तब्बल १५४ झाडं कापावी लागणार आहेत. तर १५० झाडं पुनर्रोपित केली जाणार आहेत. याबाबत ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’नं पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडं अर्ज पाठवला आहे.


३१ झाडांची छाटणी

‘मेट्रो २ ए’ या मार्गाचे व्यवस्थापक ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ असून त्यांनी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडं अर्ज पाठवला आहे. त्यानुसार डी. एन. नगर ते ओशिवरा नालादरम्यानची ३१ झाडं कापावी लागणार आहेत, तर इथली ८८ झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. दहिसरमधील ७० झाडं कापावी लागणार आहेत, तर ४१ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत. या मार्गासाठी कांदिवलीतील लालजी पाडा ते महावीर नगर जंक्शनमधील ५३ झाडे कापावी लागणार आहेत, तर २१ झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत.


हरकती व सूचना

वृक्ष प्राधिकरणानं ही झाडं हटवण्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. दरम्यान, कासारवडवली ते वडाळा (मेट्रो ४) आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (मेट्रो ६) या दोन मेट्रो मार्गिकांमधील १८२१ झाडं हटविण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, या झाडांकरिता ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’द्वारे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी व विसंगती आढळून आल्यानं हा प्रस्ताव प्राधिकरणाला परत पाठवण्यात आले आहेत.हेही वाचा -

पुनर्मूल्यांकनातून मुंबई विद्यापीठाची २ कोटी ३६ लाख रुपयांची कमाई

दिवाळीनंतर मिळणार बेस्ट कामगारांना बोनसRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा