दिवाळीनंतर मिळणार बेस्ट कामगारांना बोनस

अखेर बेस्टनं दिवाळीनंतर कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

महापालिका आणि रेल्वे कामगारांसह बेस्टच्या कामगारांनाही दिवाळी बोनस दिला जातो. मात्र, यंदाचा कामगारांचा दिवाळी बोनस रखडला. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं कामगारांच्या बोनसचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. मात्र, अखेर बेस्टनं दिवाळीनंतर कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं.

२ दिवसांत जमा

बेस्ट उपक्रमातील सुमारे ३२ हजार कामगारांच्या खात्यात प्रत्येकी ९ हजार १०० रुपयांची रक्कम २ दिवसांत जमा होणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. कामगारांना बोनस देण्याबाबत बेस्ट समिती बैठकीत एकमतानं मान्यता देण्यात आली होती. परंतु, आचारसंहितेच्या निर्बंधामुळं कामगारांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळं ऐन दिवाळीत कामगारांना बोनस मिळू शकला नाही.

आचारसंहिता संपुष्टात

२७ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर लागलीच बोनसचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगळवारी बेस्ट समितीची बैठक घेण्यात आली. त्यात, प्रशासनाकडून बोनसची घोषणा करण्यात आली. दरम्यान मंगळवारी झालेल्या या बैठकीत गतवर्षी प्रशासनानं बोनस जाहीर केला. मात्र, अद्याप कामगारांना एक छदामही मिळाला नव्हता. ही बाब लक्षात घेत मंगळवारच्या बैठकीतही कामगारांना बोनस देण्याविषयी सर्व सदस्यांनी आग्रही भूमिका घेत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी बोनस न दिल्यास पुढील बैठक न घेण्याचा गंभीर इशारा दिला.हेही वाचा -

बेस्टचं तिकीट भाडं वाढणार नाही, प्रवाशांना दिलासा

भाजपा-शिवसेनेची बैठक उद्धव ठाकरेंनी केली रद्दसंबंधित विषय
ताज्या बातम्या