SHARE

यंदा दिवळीनिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही बोनस जाहीर करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांसह बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही ९,१०० रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. मात्र, दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, अद्याप कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळालेला नाही. राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं कर्मचाऱ्यांचा बोनस रखडल्याचं सांगितलं जातं आहे.


निर्णय घेणं प्रलंबित

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं बेस्ट समिती बैठकीत बोनसबाबत अद्याप निर्णय घेणं प्रलंबित आहे. त्याशिवाय आचारसंहिता देखील रविवार २७ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येणार आहे. परंतु, २७ ऑक्टोबरपासून देशभरात दिवाळी साजरी केली जाणार असून, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हाती बोनस आलेला नाही. त्यामुळं बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


निर्णय रखडला

बोनसवर बेस्ट समिती बैठकीत शिक्कामोर्तब होणं आवश्यक आहे. मात्र, आचारसंहितेमुळं बेस्ट समिती बैठकीत हा निर्णय रखडला आहे. मात्र, आता २९ ऑक्टोबर रोजी बैठक बोलावून बोनसचा प्रश्न मिटवता येणार असल्याची माहिती मिळते. बोनसमुळं बेस्टच्या तिजोरीवर ३७ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.


कर्जाची परतफेड

मागील वर्षी बेस्टनं जाहीर केलेला दिवाळी बोनस अजूनही देण्यात आलेला नाही. तसंच, २०१७ मध्ये दिवाळीत जाहीर केलेली ५ हजार ५०० रुपये बोनसची रक्कम त्यानंतर ५ समान हप्त्यांत कापून घेण्यात आली होती. दरम्यान, यंदा महापालिकेनं बेस्टला कर्जाची परतफेड करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळं आता तरी बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांना मागील वर्षीचा शिल्लक आणि यंदाचा बोनस देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

PMC बँक घोटाळा : रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार

बँकांमध्ये होणार ५ दिवसांचा आठवडासंबंधित विषय
ताज्या बातम्या