PMC बँक घोटाळा : रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार

सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने पीएमसी बँकेसंबंधी निर्णय घेणं शक्य नसल्याचं आरबीआयने सांगितलं आहे, अशी माहिती एका खातेदाराने दिली.

PMC बँक घोटाळा : रिझर्व्ह बँक ३० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेचे खातेदार काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलकांची रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानात भेट घेतली.  रिझर्व्ह बँक पीएमसी बँकेसंबंधी ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहे. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाला ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने पीएमसी बँकेसंबंधी निर्णय घेणं शक्य नसल्याचं आरबीआयने सांगितलं आहे, अशी माहिती एका खातेदाराने दिली.  २५ आणि २७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल. तर ३० ऑक्टोबरला पीएमसी बँकेसंबंधी निर्णय घेऊ, असं आरबीआयने सांगितलं आहे. 

रिझर्व्ह बँकने पीएमसी बँकतून पैसै काढण्यावर मर्यादा आणली आहे. त्यामुळे अनेक खातेदार तणावग्रस्त आहेत. या तणावामुळे दोन खातेदारांचा मृत्यूही झाला. काही खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करत पैसे काढण्यावर मर्यादा आणणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. दरम्यान, पीएमसी बँक घोटाळाप्रकणी अटकेत असणाऱ्या आरोपी राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.हेही वाचा  -

PMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा