PMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ

पोलिसांनी सुरजीत सिंह अरोराला मंगळवारी किला कोर्टात हजर केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ केली.

PMC बँक घोटाळा : माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्यातील आरोपी बँकेचा माजी संचालक सुरजीत सिंह अरोराच्या पोलिस कोठडीत २४ आॅक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. पोलिसांनी सुरजीत सिंह अरोराला मंगळवारी किला कोर्टात हजर केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ केली. 

सुरजीत सिंह अरोराला १७ आॅक्टोबरला पोलिस कोठडी मिळाली होती. मंगळवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अरोराला कोर्टात हजर केलं. यावेळी पोलिसांनी अरोराच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. पीएमसी बँक घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, सुरजीत सिंह अरोराने आपल्या पदाचा दुरूपयोग करत या घोटाळ्याला हातभार लावला आहे. 

पीएमसी (pmc) बँकेत तब्बल ४३५५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्र सरकार पीएमसी बँकेचं दुसऱ्या बँकेत विलीनीकरण करण्याचा विचार करत आहे. बँक घोटाळ्यामुळे बँकेच्या खातेदारांना कोणताही त्रास होऊ नये साठी आम्ही दुसरा पर्याय शोधत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हेही वाचा -

सिटी बँकेच्या खातेदारांचा मतदानावर बहिष्कार, 'हे' आहे त्यामागचं कारण
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा