Advertisement

बेस्टचं तिकीट भाडं वाढणार नाही, प्रवाशांना दिलासा


बेस्टचं तिकीट भाडं वाढणार नाही, प्रवाशांना दिलासा
SHARES

बेस्टनं तिकीट दरात कपात केल्यानं प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मात्र, २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात २ हजार २४९ कोटींहून जास्त अंदाजित तूट दाखविण्यात आली आहे. त्यामुळं बेस्टच्या तिकीट दरात वाढ होणार का असा सवाल उपस्थित होत होता. परंतु, मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत हा अर्थसंकल्प मांडण्यात आला असून, यामध्ये तिकीट दरात भाडेवाढ करण्यात आलेली नाही. बेस्टच्या या निर्णयामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला, तसंच पुढे ५ रुपयांत प्रवास करता येणार आहे.


अर्थसंकल्पात तुट

सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तुटीचा आकडा २ हजार २४९ कोटी ७४ लाख रुपयांवर पोहोचला आहे. या अर्थसंकल्पात परिवहन विभागाचे उत्पन्न १ हजार ४९५ कोटी रुपये आणि खर्चाची बाजू ३ हजार ८४५ कोटी रुपये इतकी दाखविण्यात आली आहे. तसंच, विद्युत पुरवठा विभागाचं उत्पन्न ४ हजार ०६३ कोटी रुपये आणि खर्चाचा आकडा ३ हजार ९६३ कोटी दर्शविण्यात आला आहे.


बेस्टचा तोटा

बेस्टच्या परिवहन विभागातील तूट ही प्रामुख्यानं भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या बससेवांसाठी गृहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन स्थितीत बेस्टच्या परिवहन विभागाच्या तोट्याची रक्कम २ हजार २०० कोटी रुपये आहे. २०१८ ते २०१९ कालावधीत बेस्टचा तोटा ३८० कोटी रुपयांच्या जवळपास होता. मात्र, हा तोटा २०१९-२० मध्ये ८३३ कोटी रुपयांवर गेला. त्यामुळं बेस्टची आर्थिक स्थिती आणखीनच खालावण्याची शक्यता आहे.


३५ रुपये उत्पन्न

मुंबई पालिकेनं बेस्टला आर्थिक मदत दिल्यानंतर उपक्रमाची स्थिती सुधारण्यास मदत झाली. त्याशिवाय, बेस्टनं तिकिटांमध्ये कपात केल्यानं प्रवासीही वाढले. पण दैनंदिन उत्पन्न कमी होत चाललं आहे. आता बेस्टला १०० रुपयांच्या खर्चापोटी फक्त ३५ रुपये उत्पन्न मिळत आहे.


अर्थसंकल्प सीलबंद 

बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी १० ऑक्टोबर रोजी अर्थसंकल्प बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याकडे सुपूर्द केला होता. पण, तेव्हा आचारसंहितेमुळं हा अर्थसंकल्प सीलबंद होता. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मंगळवारच्या बैठकीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.



हेही वाचा -

भाजपा-शिवसेनेची बैठक उद्धव ठाकरेंनी केली रद्द

पावसात भिजण्याचा अनुभव कमी पडला, मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा