Advertisement

धक्कादायक वास्तव! २ दिवसांत आरेतील 'इतक्या' झाडांची कत्तल!!

आरेतल्या वृक्षतोड प्रकरणावर मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळानं आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करत आतापर्यंत किती झाडं कापल्याची माहिती दिली आहे.

धक्कादायक वास्तव! २ दिवसांत आरेतील 'इतक्या' झाडांची कत्तल!!
SHARES

मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या आरेतील वृक्षतोडीच्या मुद्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला. पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोड करण्यास न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अखेर मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळानं आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. यासंदर्भात मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करत आतापर्यंत किती झाडं कापल्याची माहिती दिली आहे.

'इतकी' झाडं तोडली

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरेतील वृक्षतोड थांबवत असल्याचं मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरेतल्या मेट्रो कारशेडच्या जागी एकही झाड तोडलं जाणार नाही. फक्त तोडलेली झाडं तिकडून साफ करणार, असंही प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट करण्यात आलं. हायकोर्टानं दिलेल्या परवानगीनंतर ४ ते ५ ऑक्टोबरला वृक्षतोड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या २ दिवसांत २ हजार १८५ झाडं तोडण्यात आली. सध्या ही कापलेली झाडं हटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

...म्हणून रातोरात कापली झाडं?

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात हे देखील नमूद केलं आहे की, कारशेडचं काम गेले ६ महिने रखडलं होतं. कारशेडच्या कामासाठी २ हजार १८५ झाडं कापली असली तरी आम्ही २३ हजार ८४६ झाडं लावली आहेत. याशिवाय २५ हजार रोपटांचं वाटप केल्याचं मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळानं स्पष्ट केलं.

पुढील सुनावणी कधी?

सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोड करण्यास स्थगिती दिली. ग्रेटर नोएडातील विद्यार्थ्यानं लिहिलेल्या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं स्यु मोटू याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं वृक्षतोडीला स्थगिती देण्याबरोबरच अटक केलेल्या आंदोलकांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.



आरेतील वृक्षतोड ताबडतोब थांबवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा