मेट्रो ३ च्या स्थानकांचा आराखडा बनवणार इंजिनिअरिंगचे ९५ विद्यार्थी

मेट्रो ३ च्या मार्गावरील स्थानक आणि त्याच्या आसपासचा परिसर कसा असेल याचा आराखडा मुंबईतील आर्किटेक्चर आणि इंजिनियरिंग कॉलेजमधील ९५ विद्यार्थी मिळून तयार करत आहेत.

मेट्रो ३ च्या स्थानकांचा आराखडा बनवणार इंजिनिअरिंगचे ९५ विद्यार्थी
SHARES

मेट्रो ३ च्या मार्गावरील स्थानक आणि त्याच्या आसपासचा परिसर कसा असेल याचा आराखडा मुंबईतील आर्किटेक्चर आणि इंजिनियरिंग कॉलेजमधील ९५ विद्यार्थी मिळून तयार करत आहेत. कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मार्गावरील ३ स्थानकांचा आराखडा बनवण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली आहे. मेट्रो ३ मार्गावर २७ स्थानके असून, यातील २६ स्थानके भूमिगत तर एक स्थानक जमिनीवर आहे.  

३ स्थानके

आरेतील कारशेडचा मार्ग मोकळा झाल्यापासून मेट्रो ३ च्या कामाने वेग घेतला आहे. मेट्रोच्या ३ स्थानकांचा आरखडा कसा असावा यासंदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC)तर्फे ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंबईतील आर्किटेक्चर आणि इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांची एक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबईतील ५१ कॉलेजातील विद्यार्थी सहभागी झाले होते. 

५१ टीम्सचा समावेश

या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या ५१ टीम्सने बनवलेल्या आराखड्यातून १९ टीमच्या आराखड्यांची निवड करण्यात आली.  प्रत्येक टीममध्ये ५ विद्यार्थी होते. अशा ९५ विद्यार्थ्यांना आता पुढील टास्क म्हणून मेट्रो स्थानक आणि परिसरातील आराखड्याचा ३ हजार शब्दांमध्ये विस्तृत स्वरुपात अहवाल सादर करण्यास ‘एमएमआरसी’ने सांगितलं आहे. 

भविष्यातील गरज

भविष्यातील परिस्थिती आणि वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी मेट्रोच्या स्थानकांचा आराखडा बनवत आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी हे १९  ते २२ वर्षे वयोगटातील आहेत, असं आब्जर्वर रिसर्च फाउंडेशनच्या सदस्य सायली मानकीकार यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांनी बनवलेला आराखडा आणि त्यांचा अहवाल विशेष समितीच्या समोर ठेवण्यात येईल. त्यातून अंतिम आराखडा आणि अहवाल निवडून तो नोव्हेंबर महिन्यांत मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात येईल. व पुढं सल्लागार कंपनीच्या हाती सोपवण्यात येऊन त्यावर काम सुरू करण्यात येईल. हेही वाचा-

मुंबई मेट्रोत १,०५३ जागांसाठी भरती

मेट्रो कारशेडसाठी रातोरात कापली आरेतील झाडं, स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक
संबंधित विषय