मुंबई मेट्रोत १,०५३ जागांसाठी भरती

एका बाजूला मेट्रोचं जाळं विस्तारत असताना त्यातून नोकरीच्या नवीन संधीही निर्माण होत आहे. मुंबई मेट्रोने नुकतीच १ हजार ५३ जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

SHARE

एका बाजूला मेट्रोचं जाळं विस्तारत असताना त्यातून नोकरीच्या नवीन संधीही निर्माण होत आहे. मुंबई मेट्रोने नुकतीच १ हजार ५३ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यास इच्छुक तरूणांसाठी ही मोठी संधी असून त्यासाठी उमेदवारांना www.mmrda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरावा लागेल.

'अशी' असेल प्रक्रिया 

शिक्षणाच्या पात्रतेनुसार वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना १६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान अर्ज सादर करता येतील. खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ३०० रुपये, तर राखीव कोट्यातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क १५० रुपये असतील. उमेदवारांनी भरलेल्या अर्जांची छाननी करून निवडलेल्या अर्जदारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या  उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. या प्रक्रियेत निवड झाल्यास उमेदवारांना पदानिहाय सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळेल.  

'या' पदांचा समावेश

एकूण १ हजार ५३ पदांमध्ये स्टेशन मॅनेजर, स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर, ट्रोन ऑपरेटर, ट्रॅफिक कंट्रोलर, सेफ्टी सुपरवायझर, टेक्निशियन इ. पदांचा समावेश आहे.हेही वाचा-

उद्धव माझे लहान भाऊ- नरेंद्र मोदी

कासारवडवली-गायमुख मेट्रोसाठी कंत्राटदाराची नियुक्तीसंबंधित विषय
ताज्या बातम्या