उद्धव माझे लहान भाऊ- नरेंद्र मोदी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे लहान भाऊ आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या भाषणादरम्यान केलं.

SHARE

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे लहान भाऊ आहेत, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या भाषणादरम्यान केलं. मुंबईतल्या मेट्रोच्या ३ नव्या मार्गांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते. 

१०० लाख कोटी 

सरकारकडून पुढील ५ वर्षांत पायाभूत सोयी सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचं म्हणत त्यांच कौतुकही केलं. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले उद्धव ठाकरे यांनीही मोदी यांचं कौतुक केलं. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. लवकरच समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण होईल असाही विश्वास ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केला.

या मार्गांचं भूमिपूजन

मोंदीच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलात ३ मेट्रो मार्गांची पायाभरणी करण्यात आली. त्यांत मेट्रो १० गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) ९.२ किमी, मेट्रो ११ वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२.७ किमी, मेट्रो १२ कल्याण ते तळोजा २०.७ किमी या मार्गांचा समावेश होता. या ३ मार्गांमुळे मेट्रो मार्गाच्या जाळ्यात ४२ किमीने वाढ होणार आहे. 

 यासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, मुंबईत सध्या केवळ ११ किमीचे मेट्रो नेटवर्क आहे. पण २०२० पर्यंत मेट्रोचं जाळं सव्वा तीनशे किमीपेक्षा जास्त असेल. मुंबईत मेट्रोच्या माध्यमातून १० हजार इंजिनिअर ४० हजार अन्य रोजगार उपलब्ध होतील.हेही वाचा-

मेट्रो २ चा डबा मुंबईत दाखल

‘आरे वाचवा, मुंबई वाचवा’, पर्यावरणप्रेमींचं आंदोलनसंबंधित विषय
ताज्या बातम्या