Advertisement

मेट्रो २ चा डबा मुंबईत दाखल

मुंबई मेट्रो (Metro) २ आणि ७ चं काम प्रगतीपथावर असून या मेट्रोचे डबे नुकतेच बंगळुरूतून मुंबईत दाखल झाले आहेत. हे डबे वांद्रे-कुर्ला (BKC) येथील एमएमआरडीए मैदानावर ठेवण्यात आले आहेत.

मेट्रो २ चा डबा मुंबईत दाखल
SHARES

मुंबई मेट्रो (Metro) २ आणि ७ चं काम प्रगतीपथावर असून या मेट्रोचे डबे नुकतेच बंगळुरूतून मुंबईत दाखल झाले आहेत. हे डबे  वांद्रे-कुर्ला (BKC) येथील एमएमआरडीए मैदानावर ठेवण्यात आले आहेत. यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीवही उपस्थित होते.

८० टक्के काम पूर्ण

दहिसर ते डी.एन.नगर  (मेट्रो २ अ), डी.एन.नगर ते मंडाले (मेट्रो २ ब) आणि दहिसर (पू) ते अंधेरी (पू) (मेट्रो ७) या मेट्रो मार्गिकांचं काम जलदगतीने सुरू आहे. यातील 'मेट्रो ७' मार्गिकेचं बांधकाम जवळपास ८० टक्के पूर्ण झालं आहे. त्यामुळे मेट्रो गाड्यांच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.

३०१५ कोटींचा करार 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (MMRDA)ने मेट्रोचे डबे तयार करण्यासाठी बंगळुरूतील 'मे.बी.ई.एम.एल' या कंपनीशी नोव्हेंबर २०१८ मध्ये ३०१५ कोटी रुपयांचा करार केला आहे. या कंत्राटाअंतर्गत १८ महिन्यानंतर पहिला चाचणी डबा मुंबईत दाखल झाला आहे. करारानुसार ६ डब्यांच्या ६३ मेट्रो तयार करण्यात येणार असून पहिली मेट्रो जुलै, २०२० मध्ये मुंबईत दाखल होईल. या व्यतिरिक्त मेट्रो मार्गांचं विस्तारीकरण लक्षात घेऊन आणखी २१ मेट्रो बनवण्याचं कंत्राटही कंपनीला देण्यात आलं आहे.

‘असे’ असतील डबे 

मेट्रोचे डबे हलके आणि उर्जा वाचविणारे असतील. या ट्रेन्स पूर्णपणे स्वयंचलित असतील. त्यात ३३४ प्रवाशांची आसनव्यवस्था असेल. एकूण २०९२ प्रवासी एका ट्रेनमधून प्रवास करू शकतील. डब्यामध्ये व्हिलचेअरसाठी जागा उपलब्ध असेल, तर डब्यांबाहेर सीसीटीव्ही असतील. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रोच्या चालकाशी संवाद साधता येईल. प्लॅटफाॅर्मवर स्क्रीन डोअर लावण्यात येतील. 



हेही वाचा-

मेट्रो कारशेडसाठी आरेतील २७०२ झाडांची होणार कत्तल, महापालिकेने दिली परवानगी

मुंबईच्या डबेवाल्यांची मोनो आणि मेट्रोतून डबे नेण्याची मागणी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा