Advertisement

मुंबईच्या डबेवाल्यांची मोनो आणि मेट्रोतून डबे नेण्याची मागणी

मोनो आणि मेट्रोतून डबे नेण्यासाठी मुंबई डबेवाला असोशिएशनच्यावतीनं एमएमआरडीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांची मोनो आणि मेट्रोतून डबे नेण्याची मागणी
SHARES
Advertisement

मुंबईसह उपनगरात रेल्वनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळं लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो यां संवांचं जाळं विणलं जात आहे. मोनो आणि मेट्रोमधून प्रवाशांना जाण्यास परवानगी आहे. मात्र, डबेवाल्यांनी नाही, त्यामुळं डबेवाल्यांनाही मोनो आणि मेट्रोतून डबे नेता यावे यासाठी मुंबई डबेवाला असोशिएशनच्यावतीनं एमएमआरडीचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.

विदेशाच्या धर्तीवर अभ्यास

'मेट्रो आणि मोनो रेल्वे मुंबईत आणली खरी पण ती आणताना विदेशाच्या धर्तीवर तिचा अभ्यास करण्यात आला असून,त्यानुसार ती मुंबईत आणली. मुंबई खऱ्या अर्थानं कामगारांचीकष्टकऱ्यांची व लहान-सहान व्यापार उद्योग करणाऱ्यांची आहे. हा वर्ग मुंबईत काम करत असताना अथवा प्रवास करत असताना त्यांच्याकडं थोडंफार तरी सामान असत. दरम्यान, ठराविक वजन व लांबीचं सामान मॅट्रोतुन नेता येत', असं सुभाष तळेकर यांनी म्हटलं. 

लगेज डब्याची मागणी

डबेवाल्यांचा साहेब मोनो व मेट्रोनं आॅफीसला जावू शकतो. पण त्यांचा डबे पोहोचवण्यासाठी  आम्ही जावू शकत नाही. त्यामुळं याबाबत लवकरच मुंबई डबेवाला असोशिएशनच्यावतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनात मोनो आणि मेट्रोतून कामगारांना थोडं फार सामान घेऊन जाण्यास परवानगी द्यावी. तसंच, लगेज डबा जोडावा अशी करण्यात येणार आहे. हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी ज्योतिरादित्य सिंधीया यांची निवड

एसटी बसमधून २० किलोपेक्षा जास्त वजनाचं सामान नेल्यास पाचपट भाडंसंबंधित विषय
Advertisement