महाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यावर


SHARE

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी तयारीला लागलेत. आशातच आता विधानसभा निवडणुकीसाठीच्या छाननी समितीचे अध्यक्षपद मध्यप्रदेशचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडं सोपविण्यात आलं आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती. सिंधीया यांच्या निवडीमुळं महाराष्ट्र कॉंग्रेसला मोठा लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उमेदवार निश्चितीचं काम

विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांना निश्चित करण्याचं काम ही समिती करणार आहे. या समितीत सिंधीया यांच्या व्यतिरिक्त मल्लिकार्जुन खर्गे, हरिष चौधरी, मणिक्कम टागोर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, तसेच आमदार के.सी. पडवी यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणूक समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढविण्यासंदर्भात समितीचं मत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जम्मू काश्मीरविषयी भाजप सरकारनं नुकत्याच घेतलेल्या निर्णयाला सिंधीया यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळं सिंधीया भाजपमध्ये येणार अशा चर्चांना उधाण आलं होतंहेही वाचा -

एसटी बसमधून २० किलोपेक्षा जास्त वजनाचं सामान नेल्यास पाचपट भाडं

स्पाईस जेटच्या विमानासमोर अज्ञात व्यक्ती, थोडक्यात टळला अनर्थसंबंधित विषय
ताज्या बातम्या