स्पाईस जेटच्या विमानासमोर अज्ञात व्यक्ती, थोडक्यात टळला अनर्थ


SHARE

स्पाइसजेट विमानाच्यासमोर एक अज्ञात व्यक्ती आल्याची घटना मुंबई विमानतळावर घडली आहे. या व्यक्तीचं नाव अद्याप समजलेलं नाही. विमान उड्डण करत असताना अचानक हा व्यक्ती विमानतळाची भिंत पार करत आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत माहिती मिळताच विमानतळावरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तसंच या प्रकरणी पोलीस आता आधिक तपास करत आहेत. 

इंजिन बंद 

मुंबई विमानतळावर गुरुवारी ही घटना घडली. विमानासमोर एक व्यक्ती उभा असल्याचं समजताचं विमानातील पायलटनं इंजिन बंद केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र, गुरुवारी संध्याकाळपर्यंत या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल न करण्यात आल्याचं समजतं. 

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं या प्रकरणी कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे प्रवक्ता यांच्या म्हणण्यानुसार, अज्ञात व्यक्ती विमानतळाच्या धावपट्टीच्या दिशेनं धावत होता. त्यावेळी त्यानं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्याला पकडण्यात आलं.हेही वाचा -

साडे आठ तासानंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर

बेस्टनं फेडलं ५३१ कोटी रुपयांचं कर्जसंबंधित विषय
ताज्या बातम्या