Advertisement

मेट्रो कारशेडसाठी आरेतील २७०२ झाडांची होणार कत्तल, महापालिकेने दिली परवानगी

आरे मेट्रो कारशेडसाठी मुंबईतल्या गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यात येणार असून, ४६९ झाडं पुनर्रोपित करत येणार आहेत.

मेट्रो कारशेडसाठी आरेतील २७०२ झाडांची होणार कत्तल, महापालिकेने दिली परवानगी
SHARES

आरे मेट्रो कारशेडसाठी (Metro carshed) मुंबईतल्या गोरेगाव येथील आरे कॉलनीमधील (Aarey colony) २७०२ झाडं (Tree) कापण्याची किंवा पुनर्रोपित करण्याची परवानगी मुंबई महापालिकेच्या (BMC) वृक्ष प्राधिकरणा (Tree authority)ने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) दिली आहे. 

'एमएमआरसीएल'ने वृक्ष प्राधिकरणासमोर २२३८ झाडं कापण्याचा तसंच ४६४ झाडं पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी देण्यात आली. 'एमएमआरसीएल'ने २१ जुलै २०१७ रोजी हा प्रस्ताव प्राधिकरणासमोर ठेवला होता.  

प्रस्तावास मंजुरी

परंतु, स्थानिकांनी या प्रस्तावाला विरोध केला. शहरात पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि इतर प्रकल्पांसाठी (Projects) झाडं कापायची असल्यास वृक्ष प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक आहे. मात्र, २०१८ मध्ये उच्च न्यायालयानं (Bombay High Court) प्राधिकरणाकडं  तज्ज्ञ व्यक्ती नसल्यानं प्राधिकरणाच्या कामकाजावर स्थगिती आणली होती. त्यानंतर महापालिकेने प्राधिकरणासाठी ५ तज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ यांची नियुक्ती केल्यावर जून महिन्यात ही स्थगिती उठवण्यात आली.

'अशी' मिळाली मंजुरी

याप्रकरणी पर्यावरणप्रेमी न्यायालयात गेल्यावर झाडं कापण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास मनाई करून पर्यावरणप्रेमी तसंच वृक्षप्रेमींचं म्हणणं ऐकून घेण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या. त्यानुसार महापालिकेने १० ऑक्टोबर २०१८ रोजी नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या. त्यावर  सुमारे ८० हजार मुंबईकरांनी हरकती आणि सूचनांद्वारे झाडांच्या कत्तलीला विरोध केला. या सूचना आणि  हरकतींचा अहवाल वृक्ष प्राधिकरणाने न्यायालयात सादर केल्यावर २१ सप्टेंबर २०१८ रोजी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी, तर ४ जुलै २०१९ व २१ ऑगस्ट २०१९ रोजी वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी झाडांची पाहणी केली. त्यानंतर  ६ ऑगस्ट रोजी प्रस्ताव फेटाळल्यानंतर २९ ऑगस्ट रोजी पुन्हा प्रस्ताव मांडून झाडे कापण्यास मंजुरी.

बहुमतानं प्रस्ताव मंजूर

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रस्तावाला भाजपा (BJP) आणि तज्ञ सदस्यांच्या मदतीनं महापालिका आयुक्त (BMC Commissioner) प्रवीणसिंह परदेशी (Praveen pardeshi) यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु, सत्ताधारी शिवसेना (Shiv sena) या प्रस्तावाला विरोध करत आहे. परंतु, महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असली तरी, भाजप आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या (NCP) सदस्यांनी पठिंबा दिल्यानं बहुमतानं हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.हेही वाचा -

मुंबईतील ‘हे’ ३ आमदार कामगिरीत सर्वोत्तम, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल सादर

राणेंच्या पक्षाचं होणार भाजपात विलिनीकरण!Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा