Advertisement

कासारवडवली-गायमुख मेट्रोसाठी कंत्राटदाराची नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(MMRDA) च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कासारवडवली ते गायमुख या मेट्रो ४ ए, मार्गिकेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.

कासारवडवली-गायमुख मेट्रोसाठी कंत्राटदाराची नियुक्ती
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(MMRDA) च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कासारवडवली ते गायमुख या मेट्रो ४ ए, मार्गिकेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. या मार्गिकेमुळे घोडबंदर मार्गावर मेट्रोचा पर्याय निर्माण होणार आहे. मेट्रो ४ ए गायमुख ते शिवाजी चौक, मेट्रो १० आणि कासारवडवली, ठाणे ते वडाळा मेट्रो ४ या दोन मार्गिकांना जोडणारी मार्गिका आहे. 

३४२ कोटींचं कंत्राट

‘एमएमआरडीए’च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत मे. जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि. यांना ३४२ कोटी रुपयांचं कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कंत्राटानुसार कंपनीला कासारवडवली ते गोविनवाडा आणि गोविनवाडा ते गायमुख दरम्यानचं स्थापत्य काम आणि गोविनवाडा व गायमुख या २ स्थानकांचं स्थापत्य काम करावं लागणार आहे.

विस्तारीत मार्ग

‘कासारवडवली ते गायमुख हा २.७ किमी लांबीचा मेट्रो मार्ग वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग ४ चा विस्तारित मार्ग आहे. हा मार्ग सुरू झाल्यास या मार्गावरून १.३ लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज असल्याचं ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितलं.



हेही वाचा-

मेट्रो २ चा डबा मुंबईत दाखल

आरेमधील वृक्षतोडीला राज ठाकरे, लतादिदींचा विरोध



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा