Advertisement

वांद्रे-कुर्ला संकुलास जोडणाऱ्या उन्नत मार्गाचं काम लवकरच होणार पुर्ण


वांद्रे-कुर्ला संकुलास जोडणाऱ्या उन्नत मार्गाचं काम लवकरच होणार पुर्ण
SHARES

पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुल यांना जोडणाऱ्या या उन्नत मार्गामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे कुर्ला संकुल गाठताना तीन किलोमीटर अंतर आता वाचणार आहे. कारण बीकेसी कनेक्टर या उन्नत मार्गाची उर्वरित कामं पुर्ण करण्यात येणार आहेत. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या हा मार्गाचं काम ९ नोव्हेंबपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं जाहीर केली.

पूर्व द्रुतगती मार्गावरून शीव जवळील सोमय्या मैदान येथून सुरू होणारा हा १.६ किमी लांबीचा चार पदरी उन्नत मार्ग चुनाभट्टी स्थानक, कुर्ला-सायन रेल्वे मार्ग आणि मिठी नदीवरून जात वांद्रे कुर्ला संकुलात उतरतो.

कामं अंतिम टप्प्यात

  • बीकेसी कनेक्टर या उन्नत मार्गावरील रस्ता दुभाजक बांधकाम
  • लेन मार्किंग करणं
  • ध्वनीरोधक यंत्रणा बसविणं
  • रेल्वे पुलावर संरक्षक जाळ्या बसविणं
  • अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी दोन्ही बाजूंना लोखंडी कमानी उभारण्याचं

इत्यादी काम अंतिम टप्प्यात असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं. त्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊन पूर्व उपनगरातून वांद्रे-कुर्ला संकुलात येणाऱ्यांचा प्रवास जलद होणार आहे.


हेही वाचा -

राणी बागेत पेंग्विनच्या गप्पा-गोष्टी मिळणार ऐकायला

बेरोजगारांसाठी खूशखबर, पोस्टात 'एवढ्या' पदांसाठी भरती



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा