SHARE

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणी बागेतील प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. राणीबागेत आलेल्या परदेशी पेंग्विनला पाहण्यासाठी प्राणी संग्रहालया मोठी गर्दी करत आहे. दररोज राणीबागेला १५ हजार पर्यटक भेट देत असून सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३० हजारांवर जातो. आता या पर्यटक आणि मुंबईकरांना पेंग्विनचा आवाज ऐकायची संधी मिळणार आहे.

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई प्राणिसंग्रहालयात देशी थाटात राहणाऱ्या ऑलिव्ह, पोपाय, बबल, मिस्टर मॉल्ट, डोनाल्ड, हम्बोल्ट आणि डेझी या परदेशी मित्रपरिवारातील संवाद आता पर्यटकांना प्रत्यक्ष ऐकता येणार आहे. यासाठी पेंग्विनच्या दालनात अद्ययावत ध्वनिप्रणाली बसवण्याचा निर्णय पालिकेनं घेतल्याचं समजतं. या निर्णयावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र, यावर लवकरच घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या पेंग्विन राहात असलेला कक्ष ध्वनिरोधक आहे. १८ हजार चौरस फुटांच्या प्रशस्त काचघरात पाण्यात डुंबणारे तर कधी दुडूदुडू धावत बाजूच्या खडकावरील चेंडूंशी खेळणारे पेंग्विन पर्यटकांना फक्त पाहता येतात. आता या ७ जणांमधील संवाद ऐकण्याची संधी पालिकेकडून उपलब्ध केली जाणार आहे. पेंग्विन पक्ष्यांमधील नर आणि मादी यांचे आवाज वेगवेगळे असतात.हेही वाचा -

बेरोजगारांसाठी खूशखबर, पोस्टात 'एवढ्या' पदांसाठी भरती

भाजपची नमती भूमिका, शिवसेनेला गृह, महसूल खातं देणार?संबंधित विषय
ताज्या बातम्या