Advertisement

पश्चिम रेल्वेवर धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल


पश्चिम रेल्वेवर धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल
SHARES

पश्चिम रेल्वे प्रशासनानं महिला प्रवाशांसाठी खास महिला स्पेशल लोकल सुरू केली आहे. ही लोकल मंगळवारी संध्याकाळी ६.१५ वाजता चर्चगेट ते विरार या रेल्वे मार्गावर धावणार आहे. या गाडीच्या डब्यांमध्ये चांगली आसनं, आपत्कालीन बटण, सामानासाठी जास्त जागा असणार आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही यंत्रणाही या लोकलमध्ये कार्यन्वित करण्यात आलेली आहे.

६९ वा स्थापना दिन

५ नोव्हेंबर हा पश्‍चिम रेल्वेचा स्थापना दिवस आहे.पश्चिम रेल्वेच्या ६९ व्या स्थापना दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयींसाठी पश्‍चिम रेल्वेनं काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या दिवसाचं निमित्त साधून ही लोकल सुरू करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं दिली.

प्रायोगिक तत्वावर

सध्या ही लोकल प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणार आहे. त्यानंतर ती कायमस्वरुपी चालवली जाणार आहे. ही लोकल नॉन एसी असणार आहे. या लोकलला महिला प्रवाशांचा किती आणि कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसार अशा अन्य लोकल तयार करण्यात येणार आहेत.

महिला प्रवाशांच्या गरजा

महिला प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या लोकलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यासाठी सामानाकरिता जादा जागा, अधिक चांगली आसनव्यवस्था आणि डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. प्रथम श्रेणीच्या डब्यातील आसनव्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेली आहे. डब्याला निळ्या रंगाऐवजी ब्राऊन रंग देण्यात आला आहे.

लोकलमध्ये योग्य ते बदल

प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य काही लोकल अशापद्धतीनं तयार करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. महिलांच्या प्रतिसादानंतर या लोकलमध्ये योग्य ते बदल करण्यात येणार आहेत. यासाठी मंगळवारी संध्याकाळी प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते विरार पर्यंत ही गाडी चालविण्यात येणार आहे, असं पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितलं.



हेही वाचा -

पैसे दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन होणार प्रवास, १ डिसेंबरपासून 'हा' नियम लागू

आयपीएलमध्ये कधीही खेळाडू बदलता येणार, नवीन नियम लवकरच लागू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा