पैसे दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन होणार प्रवास, १ डिसेंबरपासून 'हा' नियम लागू

१ डिसेंबरपासून देशभरात कुठेही वाहनांना पैसे दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

SHARE

१ डिसेंबरपासून देशभरात कुठेही वाहनांना पैसे दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन प्रवास करता येणार आहे. यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकार देशभरात वन नेशन वन फास्टॅग (one nation one fastag) ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली लागू करणार आहे. यामध्ये वाहनांना फास्टॅग लावण्यात येणार आहेत.

वाहनांना फास्टॅग लावल्यामुळे वाहनांना पैसे दिल्याशिवाय टोल नाक्यावरुन प्रवास करता येणार आहे. फास्टॅग ही एक इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे. यामध्ये वाहनांच्या पुढील बाजूला फास्टॅग लावले जाणार आहेत.  गाडीवर फास्टॅग असल्यास टोल नाक्यांवर पैसे न देता  तुम्ही जाऊ शकणार आहात. फास्टॅगमध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) लावलेले असते. ज्यावेळी वाहन टोल नाक्याच्याजवळ पोहोचते तेव्हा तेथील सेंसर कारच्या स्क्रीनवर लावलेलं फास्टॅग सेंस करते आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कट होतात. एकदा हे पैसे संपल्यावर तुम्हाला फास्टॅग पुन्हा रिचार्ज करावं लागणार आहे. 


फास्टॅग अकाऊंटसाठी  पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, एक पास्टपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.  फास्टॅग सर्व टोल नाक्यांवर किंवा बँकांकडून ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. डिपॉझिटची रक्कम जमा केल्यावर तुम्ही फास्टॅग मिळवू शकता. कार, जीप आणि व्हॅनसाठी ही रक्कम २०० रुपये इतकी आहे तर ट्रक आणि ट्रॅक्टरसाठी ५०० रुपये इतकी आहे. हेही वाचा -

मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर धावणार एसटी ७० जादा बसेस

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी १०२ दिवस बंद
संबंधित विषय
ताज्या बातम्या