Advertisement

मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर धावणार एसटी ७० जादा बसेस


मुंबई-पुणे, ठाणे-पुणे मार्गावर धावणार एसटी ७० जादा बसेस
SHARES

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत स्थानकादरम्यान तांत्रिक कामासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.या ब्लॉकमुळं प्रगती एक्स्प्रेससह अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून २२ एक्स्प्रेसचं वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई ते पुणे, ठाणे ते पुणे या मार्गावर नियमित फेऱ्यांसह ७० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

ठाणे विभागातून २०, मुंबई विभागातून १५, पुणे विभागातून १५, शिवनेरी बस सेवेच्या २० बस अशा ७० जादा फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बस सोडण्याच नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आलेलं आहे.

मुंबईहून पुण्यात जाण्यासाठी शिवनेरीच्या १३९, तर परतीच्या प्रवासासाठी १३९ फेऱ्या उपलब्ध आहेत. यासह ३६ निमआराम शिवनेरीच्या फेऱ्या मुंबई-पुणे मार्गावर धावणार आहेत. मुंबई, परळ, कुर्ला येथून पुणेमार्गे २९० फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते- संजय राऊत

व्होडाफोन कंपनी भारतातील आपला व्यवसाय बंद करणार?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा