आयपीएलमध्ये कधीही खेळाडू बदलता येणार, नवीन नियम लवकरच लागू

आयपीएलमध्ये आता नवा नियम करण्यात येणार आहे. आयपीएल सामन्यांमध्ये पॉवर प्लेअरचा नियम लागू करण्याचा विचार बीसीसीआयनं केला आहे.

SHARE

आयपीएलमध्ये आता नवा नियम करण्यात येणार आहे. आयपीएल सामन्यांमध्ये पॉवर प्लेअरचा नियम लागू करण्याचा विचार बीसीसीआयनं केला आहे. नवीन नियमानुसार,  सामन्यादरम्यान खेळाडू बाद झाल्यानंतर किंवा षटक संपल्यानंतर संघाला खेळाडू बदलता येणार आहे. म्हणजे अंतिम ११ मध्ये नसलेल्या खेळाडूलाही फलंदाजीसाठी किंवा गोलंदाजीसाठी उतरवलं जाईल. 

खेळाडू बदलाचा हा नवीन नियम लागू करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात मंगळवारी आयपीएल प्रशासकीय मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत या नियमावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर हा नियम लागू होईल. 

या नवीन नियमानुसार, आयपीएलमधील संघांना ११ ऐवजी १५ खेळाडूंची निवड करता येणार आहे. सामना चालू असताना खेळाडू बाद झाला किंवा षटक संपल्यानंतर खेळाडू बदलता येणार आहे. उदा. एखादा खेळाडू अंतिम ११ मध्ये नाही पण त्याचा समावेश १५ खेळाडूंमध्ये आहे.  सामन्यामध्ये एखादा खेळाडू बाद झाला तर १५ खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या खेळाडूला तो संघ मैदानात खेळण्यासाठी उतरवू शकतो. तसंच षटक संपल्यानंतर १५ खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या खेळाडूला गोलंदाजीसाठी संघ उतरवू शकतो. 

नवीन नियमामुळे एखाद्या सामन्याचा निकाल बदलू शकतो. तसंच दोन्ही संघांना वेगळा विचार करण्यास किंवा वेगळी रणनिती आखण्यास प्रोत्साहन मिळेल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं म्हटलं. हेही वाचा -

IND Vs BNG: टी-२० सामन्यात बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

भारतीय संघात मुंबईच्या 'या' खेळाडूला संधी

संबंधित विषय
ताज्या बातम्या