Advertisement

भारतीय संघात मुंबईच्या 'या' खेळाडूला संधी


भारतीय संघात मुंबईच्या 'या' खेळाडूला संधी
SHARES

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात अनेक युवा खेळाडुंना संधी देण्यात आली होती. यामध्ये मुंबईच्या शिवम दुबे यालाही संधी देण्यात आली. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी २० मध्ये पदार्पण करणाऱ्या शिवम याला कॅप दिली आणि त्याचे संघात स्वागत केले. पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाकडून विविध खेळाडूंची चाचपणी सुरू आहे.

८२ वा टी-२० क्रिकेटपटू

भारताचे प्रतिनिधित्व करणारा शिवम हा ८२ वा टी-२० क्रिकेटपटू ठरला आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्यानं मुंबईकडून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळं त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी २० सामना दिल्ली खेळविण्यात आला. परंतु, दिल्लीतील प्रदुषणानं धोक्याची पातळी गाठल्यानं अनेक खेळाडूंना त्याचा सामना करावा लागत आहे.

आरोग्याची चिंता

दिल्लीतील प्रदुषणाबाबत बांगलादेश संघानं कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र त्यांच्या आरोग्याची चिंता अस्तित्वात आहेच. त्याशिवाय, अखेरच्या क्षणी सामना अन्यत्र हलवणे अशक्य असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

महा चक्रीवादळ: उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

पावसामुळं ५० ते ७० टक्के भाज्या कुजल्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा