मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी २ एसी लोकल दाखल

मध्य रेल्वेच्या (Central Railway) ट्रान्स हार्बर (Trans harbour) मार्गावर पहिली एसी लोकल (AC Local) धावत आहे. मात्र, या लोकलचं तिकीट (Local Ticket) अव्वाच्या सव्वा असल्यानं प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळं प्रवासी संख्या फारच कमी असल्यानं या लोकलची घडी बसण्याची शक्यता आहे. मात्र, अस असताना आणखी २ लोकल मध्य रेल्वेवर दाखल झाल्या आहेत. या एसी लोकल (AC Local) प्रवाशांसाठी रुजू केल्यास पुन्हा सामान्य लोकल (Local) फेऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे.

वाढीव तिकीटदरांमुळं (Ticket) प्रवाशांनी पहिल्या एसी लोकलला नाकारल्याचं दिसून येते. तसंच, या एसी लोकलसाठी साध्या लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळं स्थानकांत प्रवशांची गर्दी वाढत असून, धक्काबुक्की करत प्रवाशांना प्रवास करावा लागतो आहे.

धावत्या लोकलमधून होणारे अपघात (Accidents) टाळण्यासह धावत्या लोकलमधील भुरटे चोर, अनधिकृत फेरीवाले, फटका पद्धतीने होणारे गुन्हे रोखण्यासाठी एसी लोकल (AC Local) सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतला. त्यानुसार मध्य रेल्वेच्या (Central Railway) ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाली. परंतु, एसी लोकलचे तिकीट सामान्य लोकलपेक्षा महाग आहे. त्यामुळं अनेक प्रवाशांनी याकडं पाठ फिरवली. त्याशिवाय, ५ दिवसांचा आठवडा या तत्त्वानुसार अर्थात सोमवार ते शुक्रवार एसी लोकल धावत आहे.

एसी लोकलच्या फेऱ्या मर्यादित असल्यानं त्याचा पुरेपूर लाभ प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळं या लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना या लोकलच्या पुढे व मागे धावणाऱ्या लोकलमध्ये २ लोकलची गर्दी होत असल्याचं दिसून आलं आहे.

सध्या मध्य रेल्वेवर २ एसी लोकल दाखल झाल्या आहेत. यापैकी १ ट्रान्सहार्बर मार्गावर धावत असून, दुसरी एसी लोकल कुर्ला कारशेडमध्ये सज्ज होत आहे. तिसरी लोकल मुंबईत दाखल झाल्यानंतर २ लोकलच्या मदतीनं लोकल फेऱ्या वाढवून सुट्टीच्या दिवशी ही लोकल चालवण्याचं नियोजन आहे. या ३ लोकलपैकी १ लोकल राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.


हेही वाचा -

राज ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, शरद पवारांचा टोमणा

जीएसटी बुडवण्यासाठी गुजरातच्या व्यापाऱ्याचा हा पराक्रम, खावी लागली तुरूंगाची हवा


पुढील बातमी
इतर बातम्या