मोबाईल अॅपवर रोज विकली जातात लोकलची १० हजार तिकीटं!

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांच्या रांगा कमी व्हाव्यात, म्हणून मध्य रेल्वेने लोकल तिकीट अॅपची सुरूवात केली. या अॅपला आतापर्यंत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून दरदिवशी या अॅपवरुन वेगवेगळ्या स्थानकांच्या एकूण १൦ हजार तिकीटांचं बुकींग करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे डीआरएम संजयकुमार जैन यांनी दिली आहे.

दररोज १० हजार तिकीट विक्री

सुरुवातीपासून या अॅपला कमी प्रतिसाद मिळाला असला, तरीही मोबाइल अॅपची लोकप्रियता हळूहळू वाढत चालली आहे. मध्य रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये मोबाइल अॅपवरुन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांची दैनंदिन संख्या सरासरी १० हजारांवर गेली आहे.

अॅपसाठी वेगवेगळ्या मोहीम

मोबाइल अॅप प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या स्थानकांवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ठाणे, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, खांदेश्वर, बदलापूर, सानपाडा आदी स्थानकांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातून प्रवाशांच्या शंका दूर करून हे अॅप वापरण्याविषयी जनजागृती करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत.


हेही वाचा

'यूटीएस मोबाईल अॅप' आता आयफोनवरही उपलब्ध

पुढील बातमी
इतर बातम्या