Advertisement

‘आयआरसीटीसी’ला ‘रेझर पे’ची जोड, सहज होईल रेल्वे अन् विमानांचं तिकीट बुकिंग


‘आयआरसीटीसी’ला ‘रेझर पे’ची जोड, सहज होईल रेल्वे अन् विमानांचं तिकीट बुकिंग
SHARES

रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे पर्याय अवलंबले जात आहेत. त्यातच आता रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्या ‘आयआरसीटीसी’ (भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅंड टुरिझम कॉर्पोरेशन) ला 'रेझर पे' या नव्या अॅप्लिकेशनची जोड मिळणार आहे.


मोबाइलवरून काढा तिकीट

यासाठी करार करण्यात आला असून ग्राहकांना ‘आयआरसीटीसी’ ही वेबसाईट, मोबाईल अॅप, नेटबॅंकिंग, वॉलेट्स, क्रेडिट तसंच डेबिट कार्डांद्वारे ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही ग्राहकाला त्याच्याकडे मोबाइल फोन तसंच बॅंक खाते असताना ‘यूपीआय’द्वारे (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) रेल्वे तसंच विमानाची तिकीटे ऑनलाइन आरक्षित करता येतील. या यंत्रणेत ग्राहकांना आपल्या कार्डाचा तपशील भरण्याची तसंच नेटबॅंकिंग-वॉलेटचा पासवर्डदेखील भरावा लागणार नाही.


सुरक्षेची काळजी

'रेझर पे' ने ग्राहकांना ‘युपीआय’द्वारे डिजिटल पैशांच्या सुलभ हस्तांतरणासाठी ‘आयआरसीटीसी’बरोबर हातमिळवणी केली आहे. त्याचा लाभ ‘डिजिटल पेमेंट’ प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होईल. उत्तम तंत्रज्ञान असलेल्या या प्रणालीत सुरक्षाविषयक देखील काळजी घेण्यात आली आहे.


प्रवाशांच्या संख्येत वाढ

‘आयआरसीटीसी’ची वेबसार्ट आणि अॅपवर 'रेझर पे' ही कंपनी दर महिन्याला १० लाखांहून अधिक व्यवहार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये रेल्वेप्रवाशांचा आकडा गतवर्षीच्या तुलनेत ३ कोटींनी वाढला आहे. त्यामुळे 'रेजर पे' च्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुकिंग करणं सोयीचं होणार असल्याचं ‘रेजर पे’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल माथूर यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी ‘रिटेल डिजिटल पेमेंट’ क्षेत्रामध्ये ‘युपीआय’ची सर्वात मोठी वाढ झाली. गेल्या जानेवारी महिन्यात १५ कोटी १० लाख एवढे व्यवहार ‘यूपीआय’द्वारे झाले. ही वाढ ४० टक्क्यांएवढी आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा