Advertisement

'यूटीएस मोबाईल अॅप' आता आयफोनवरही उपलब्ध


 'यूटीएस मोबाईल अॅप' आता आयफोनवरही उपलब्ध
SHARES

आयफोन वापरकर्त्यांचा उपनगरीय प्रवास सोयीस्कर व्हावा, म्हणून रेल्वे प्रशासनाने आता सर्व आयओएस प्लॅटफॉर्मवर यूटीएस मोबाईल अॅप उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे आता अँड्रॉईड आणि आयओएस मोबाईल धारकांना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज लागणार नाही.

यूटीएस मोबाईल अॅप हे आतापर्यंत आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नव्हतं. प्रवाशांनी वारंवार केलेल्या मागणीनंतर रेल्वेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या यूटीएस अॅपमुळे कागदाच्या वापराचं प्रमाण कमी झाल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


यूटीएस अॅप वापरण्यासाठी हे करा -

  • यूटीएस अॅप डाऊनलोड करण्यासाठी https://itunes.apple.com/in/app/uts/id1357055366?mt=8 या लिंक वर क्लिक करा.
  • यूटीएस अॅप डाऊनलोड केल्यानंतर साईन इन किंवा लॉग इन करा
  • शहर या पर्यायात गेल्यावर मुंबई पर्याय निवडा
  • कोणतं तिकीट किंवा सीझन पास हवा आहे तो पर्याय निवडा
  • नव्या एसी लोकलचं तिकीटही आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे
  • यूटीएस अॅपच्या माध्यमातून बुक केलेलं तिकीट ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (OCR) किंवा एटीव्हीएम कियोस्क मशीनवर प्रिंट देखील केलं जाऊ शकतं
संबंधित विषय
Advertisement