वसई-ठाणे-कल्याण दरम्यान लवकरच जलमार्ग

रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे वसई-ठाणे-कल्याण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी असते. या मार्गावर रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यासाठी वसई-ठाणे-कल्याण या ५४ किलोमीटर मार्गावर जलवाहतूक प्रस्तावित आहे.

ही जलवाहतूक पुढील पावसाळ्यापूर्वी सुरु करण्याचे आश्वासन केंद्रीय परिवहन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ई बैठकीत दिली असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिली आहे.  

हा जलवाहतूक मार्ग ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, मिरा-भाईंदर या टप्प्यांतून जाणार आहे. या मार्गावर प्रवाशांसाठी १० छोट्या जेट्टीही उभारण्यात येणार आहेत. nयासाठी २१ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. याचा प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरींकडे सोपवण्यात आला आहे.

या जल वाहतुकीसाठी केंद्र आणि राज्य या दोन्हींकडून निधी मिळणार आहे. पीपीपी मॉडेलनुसार हा जलमार्ग तयार करण्यात येणार आहे. सोमवारी राज्यातील जलवाहतूक विकास कार्याबाबत झालेल्या बैठकीत या योजनेला गती देण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.


हेही वाचा -

रिक्षांच्या वयोमर्यादेत बदल, १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या रिक्षांवर बंदी

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील अपघातात वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या