पश्चिम द्रूतगती महामार्ग बनला सर्वात प्रदूषित महामार्ग

मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नसल्यामुळे मुंबईच्या सर्वच महामार्गावर वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढलं आहे. सध्या पश्चिम द्रूतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त वर्दळीचा महामार्ग बनला आहे. या महामार्गावर १० किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी ३ ते ४ तासाचा अवधी लागत आहे. त्यामुळे येथील

वायू प्रदूषण वाढल्याने हा महामार्ग राज्यातील सर्वात प्रदूषित महामार्ग बनला आहे. 

अंधेरी ते दहिसर भागात राहणाऱ्या नागरिकांना या वाढलेल्या वाहतूककोंडीचा तसेच बदलत्या हवामानाचा त्रास जाणवू लागल्यामुळे  श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडत असल्याची  माहिती बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे देण्यात आली आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृध्दांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. .

पश्चिम द्रूतगती महामार्गावर जवळपास २४ तास वाहतूक सुरू असल्याने वायूप्रदूषण वाढलं आहे. त्यासोबतच बोरीवली ते वांद्रेपर्यंत जाणारे एस. व्ही. रोड, लिंक रोडवर प्रचंड वाहतुकीमुळे वायू प्रदूषणाची समस्या जास्त आहे. 


हेही वाचा -

 मुंबईच्या या भागातील रुग्णसंख्येत घट; स्थानिकांना दिलासा

कोरोनामुळं आर्थिक स्थिती बिकट; १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळ


पुढील बातमी
इतर बातम्या