खार सबवेचा भाग कोसळल्याची अफवा, परेची वाहतूक विस्कळीत

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

जोरदार पावसामुळे अंधेरी पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज रविवरी दुपारी खार ते सांताक्रूझ रेल्वे स्थानाकादरम्यान सबवेचा भाग कोसळल्याची अफवा पसरली आणि एकच गोंधळ उडाला. पश्चिम रेल्वेला तशी माहिती मिळाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची पाहणी केली असता या सबवेचा कुठलाही भाग कोलळला नसल्याचं निदर्शनास आलं. ही केवळ एक अफवा असल्याचं निष्पन झालं. मात्र यामुळे पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.

गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वाहतूकही यामुळे बाधित झाली होती. तर तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या काही लोकल वांद्रे स्थानकातच रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. दरम्यान ५.५२ मिनिटांनी वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचं परेकडून सांगण्यात आलं.

ही तर अफवाच

रविवारी दुपारी ५ वाजेच्या दरम्यान खार आणि सांताक्रूझ स्थानाकादरम्यान सबवेचा भाग कोसळल्याची तक्रार प. रेल्वेकडे आली. ही माहिती मिळताच त्याठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र पाहणी केली असता ही अफवा असल्याचं निदर्शनास आलं. यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. 

वाहतूक ५० मिनिटे खोळंबली

पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल ५० मिनिटे खोळंबली होती. अनेक प्रवाशांनी खाली उतरुन रेल्वे रुळावरुन चालत स्टेशन गाठलं. काही दिवसापूर्वी हार्बर मार्गावरील रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे तेथील वाहतूक खोळंबली होती आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुळाला कपडा बांधुन ती वाहतूक सुरू करण्याची नामी शक्कल लढवली होती. यावर सर्वच स्तरातून टीकाही झाली होती. यामुळे रेल्वे बंद पडली की अनेकांच्या मनात धस्स होतं.


हेही वाचा -

रेल्वेची चिंधीगिरी, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावरी

पुढील बातमी
इतर बातम्या