शताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवासी घेताहेत वाचनाची ‘अनुभूती’

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना विरंगुळा मिळावा तसंच त्याच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने पश्चिम रेल्वेनं मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या ‘अनुभूती’ कोचमध्ये १ जानेवारीपासून वाचनालय सुरू केलं आहे. या वाचनालायला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प. रेल्वे या एक्स्प्रेसच्या इतर डब्यात देखील वाचनालयाची सेवा पुरवण्याचा विचार करत आहे.

१०५ पुस्तकांचा समावेश

मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या अनुभूती डब्यांमध्ये १०५ पुस्तकांसह वाचनालय सुरू करण्यात आलं आहे. या वाचनालयात राजकारण, गूढकथा, आत्मचरित्र, बालकथा यांसारखी ७० पुस्तकं आणि लहान मुलांसाठी ३५ पुस्तकं उपलब्ध आहे. त्यामुळे प्रौढ प्रवाशांसोबतच लहानगे प्रवासी देखील वाचनाचा आस्वाद घेत आहेत.

या वाचनायलाला प्रवाशांचा मिळणार प्रतिसाद पाहता मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांमध्ये वाचनालय सुरू करण्याचा प. रेल्वेचा विचार आहे, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं.


हेही वाचा-

वडाळा ते जेकब सर्कल मोनो मार्गाची प्रतीक्षा २०१९ मध्ये तरी संपणार का?

Good News: एसटी कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी ६ महिन्यांची रजा


पुढील बातमी
इतर बातम्या