पश्चिम रेल्वे पूर्ववत होण्यास मध्यरात्र उजाडणार!

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • परिवहन

मुसळधार पाऊस आणि त्यातच अंधेरी रेल्वे स्थानकावर पूल कोसळण्याची घटना घडल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक कोलमडली आहे. विरार ते गोरेगांवदरम्यान आणि वांद्रे ते चर्चगेट अशी लोकलसेवा सुरू आहे. पूल कोसळल्यानंतर ते हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यासाठी महापालिका, एनडीआरएफ आणि रेल्वे प्रशासन कामाला लागलं आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत होण्यास संध्याकाळचे सात वाजणार, असं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे. मात्र पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी मध्यरात्र उजाडणार असं विश्वसनीय सूत्रांचं म्हणणं आहे. रेल्वेमार्गावरील डेब्रिज काढण्यासाठी सात ते आठ तास लागणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

 

विरार ते गोरेगाव लोकल सुरू

अंधेरीदरम्यान पूल कोसळल्यामुळे गोरेगाव ते वांद्रेपर्यंतची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मात्र पश्चिम रेल्वेनं गोरेगांव ते विरार आणि वांद्रे ते चर्चगेट अशी लोकलसेवा सुरू केली आहे. २० ते २५ मिनिटांच्या अंतरानं दोन्ही ठिकाणी रेल्वे सोडण्यात येत आहेत. दरम्यान, पावसामुळे रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली असून नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र बेस्ट प्रशासनानं ठिकठिकाणाहून बसेस सोडल्या आहेत.

५ लोकांना बाहेर काढलं

डेब्रिजखाली अडकलेल्या ५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये ४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या पाच जणांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, आणखी दोघांना दुखापत झाली असून पाच जणांवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.


अंधेरीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरी विरार रेल्वे सेवा ठप्प

पश्चिम रेल्वे म्हणतेय, विरार-चर्चगेटदरम्यानचे सर्व पूल सुरक्षित

रेल्वेच्या दुर्लक्षामुळेच पूल कोसळला- महापौर

...आणि सावंत ठरले देवदूत


पुढील बातमी
इतर बातम्या