Advertisement

पश्चिम रेल्वे म्हणतेय, विरार-चर्चगेटदरम्यानचे सर्व पूल सुरक्षित


पश्चिम रेल्वे म्हणतेय, विरार-चर्चगेटदरम्यानचे सर्व पूल सुरक्षित
SHARES

अंधेरी येथे विलेपार्लेच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचा एक भाग कोसळल्यामुळे मंगळवारी मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी पश्चिम रेल्वे पूर्णपणे कोलमडली. आता या पूलावरून राजकारण सुरू झालं आहे. या पुलाची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असली तरी या पुलाच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून रेल्वे प्रशासनाला खर्च मिळत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेनं या घटनेची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात केली आहे. मात्र विरार ते चर्चगेट या रेल्वेमार्गावरील सर्व पूल सुरक्षित असल्याचा दावा पश्चिम रेल्वेनं केला आहे.


दोन वर्षांपूर्वी पाहणी

शरद यादव यांनी माहितीच्या अधिकारामार्फत पश्चिम रेल्वेवरील पूलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे की नाही, याची माहिती मागवली होती. त्यावर रेल्वे प्रशासनानं ११ फेब्रुवारी २०१६ रोजी विरार ते चर्चगेटदरम्यानचे सर्व पूल सुरक्षित आहे, असं एका पत्रकाद्वारे जाहीर केलं होतं.


काय म्हटलंय पत्रात ?

सिनियर सेक्शन इंजिनियर आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर यांच्या निगराणीखाली सर्व पुलांची वर्षातून एकदा पाहणी केली जाते. जर पूलाची दुरुस्ती करायची असेल तर त्यासंदर्भातील नोटीस लगेच किंवा गरजेनुसार काढली जाते. मात्र विरार ते चर्चगेटदरम्यानचे सर्व पूल सुरक्षित आहेत. जुने पूल असुरक्षित होण्याआधी त्यांची दुरुस्ती केली जाईल. पुलांची पाहणी केल्यानंतर त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येते, असं पत्रक पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल इंजिनियर (साऊथ) तुषार मिश्रा यांच्या सहीनिशी जाहीर करण्यात आलं आहे.


आरोप-प्रत्यारोप सुरू

या वर्षी या पुलांचं स्ट्रक्टरल ऑडिट करण्यात आलं होतं की नाही, याबाबत मात्र सध्या संभ्रम आहे. या पुलाची जबाबदारी ही रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिका यांची होती. या पुलाच्या देखभालीचा खर्च पालिकेकडून रेल्वे प्रशासनाला मिळत होता. मात्र या दोघांची जबाबदारी असताना रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.


हेही वाचा -

अंधेरीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरी विरार रेल्वे सेवा ठप्प



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा