Advertisement

'फोन भूत'मध्ये झळकणार कतरिना, इशान आणि सिद्धार्थ

एक्सेलनं आपल्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाची घोषणा केली आहे. यात कॅटरिना कैफ, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे कलाकार झळकणार आहेत.

'फोन भूत'मध्ये झळकणार कतरिना, इशान आणि सिद्धार्थ
SHARES

रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी स्थापन केलेल्या एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अलीकडे,  काही शो आणि चित्रपटांसह ते ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्मवर यश संपादन करत आहे. या यादीमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे.

एक्सेलनं आपल्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाची घोषणा केली आहे. यात कॅटरिना कैफ, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे कलाकार झळकणार आहेत. हा एक हॉरर-कॉमेडी असून पहिल्यांदाच हे तिघं एकत्र काम करताना दिसणार आहेत.

सोशल मीडियावर घोषणा करताना एक्सेलनं लिहिलं की, "जोपर्यंत तुम्ही घाबरत आहात तोपर्यंत तुम्ही हसत आहात." हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होईल.

२०१९ च्या सुपरहिट 'गली बॉय' या चित्रपटानंतर 'फोन भूत' एक्सेलची प्रमुख फिल्मची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच एक्सेलनं चित्रपटाचे तिन्ही कलाकार कॅटरिना, सिद्धांत आणि ईशानचं वेगळं फोटोशूट करण्यात आलं. हे फोटोशूट लॉकडाउनपूर्वी शूट करण्यात आलं होतं. आता या फोटोशूटमधील फोटो प्रदर्शित करत चित्रपटाची घोषणा केली गेली आहे.

या कॉमेडी चित्रपटाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटच्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे. गुरमीत सिंग यांनी याचे दिग्दर्शन देखील केलं आहे. तर रवी शंकरन आणि जसविंदरसिंग बाथ यांनी चित्रपटाची कथा लिहली आहे. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल आणि २०२१ मध्ये प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.



हेही वाचा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा