Advertisement

पुन्हा एकदा कंगना विरुद्ध हृतिक!

मागील बऱ्याच दिवसांपासून कंगना ‘मणिकर्णिका’ या आपल्या महत्त्वाकांक्षी सिनेमावर काम करण्यात व्यग्र आहे. या सिनेमात ती झाशीची राणी साकारत आहे. आपल्या व्यक्तिरेखांसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला नेहमीच तयार असलेला ऋतिकही सध्या ‘सुपर ३०’ या सिनेमाच्या कामात बिझी आहे. ‘सुपर ३०’मध्ये तो पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात भेटणार असल्यानं सर्वानाच या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

पुन्हा एकदा कंगना विरुद्ध हृतिक!
SHARES

अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत खाजगीत घडलेल्या गोष्टीही चव्हाट्यावर आणल्या होत्या. आता बॅाक्स आॅफिसवरही हे दोघे आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

मागील बऱ्याच दिवसांपासून कंगना ‘मणिकर्णिका’ या आपल्या महत्त्वाकांक्षी सिनेमावर काम करण्यात व्यग्र आहे. या सिनेमात ती झाशीची राणी साकारत आहे. आपल्या व्यक्तिरेखांसाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला नेहमीच तयार असलेला ऋतिकही सध्या ‘सुपर ३०’ या सिनेमाच्या कामात बिझी आहे. ‘सुपर ३०’मध्ये तो पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात भेटणार असल्यानं सर्वानाच या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

‘मणिकर्णिका’ हा सिनेमा खरं तर या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. नंतर ही तारीख १५ आॅगस्ट करण्यात आली, पण आता हा सिनेमा पुढल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्याचं झी स्टुडिओज आणि निर्माते कमल जैन यांनी घोषित केलं आहे.

हृतिकच्या ‘सुपर ३०’ या सिनेमाने यापूर्वी २५ जानेवारी २०१९ ही प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. या सिनेमात हृतिक गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. ‘सुपर ३०’मधील हृतिकचा लुक बाहेर आल्याने सर्वच या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत, पण याच दिवशी ‘मणिकर्णिका’ही प्रदर्शित होणार असल्यानं प्रेक्षक विभागले जाणार आहेत. यात कोण बाजी मारतं ते पाहायचं आहे.

हृतिकच्या सिनेमाच्या बाबतीत असं प्रथमच घडत नाही. २५ जानेवारी २०१७ ला हृतिकच्या ‘काबिल’समोर शाहरुख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, पण नंतर शाहरुखने आपला सिनेमा एक आठवडा पुढे ढकलला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा