Advertisement

'बिग बॉस 16' फेम शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकला ईडीचा समन्स

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस' आणि त्यातील स्पर्धक नेहमीच चर्चेत असतात.

'बिग बॉस 16' फेम शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकला ईडीचा समन्स
SHARES

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो 'बिग बॉस' आणि त्यातील स्पर्धक नेहमीच चर्चेत असतात. 'बिग बॉस 16' मध्ये दमदार खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकणारे शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक हे दोघेही सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. 'बिग बॉस 16'च्या या आवडत्या स्पर्धकांना 'ईडी'ने समन्स पाठवल्याच्या वृत्तानंतर खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांना हाय प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. एवढेच नाही तर हे प्रकरण कुख्यात ड्रग माफिया अली असगर शिराजीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. अली असगर शिराजी 'हस्टलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी चालवत होते ज्याने विविध स्टार्ट अप्सना आर्थिक सहाय्य केले होते.

या स्टार्टअप्समध्ये शिव ठाकरे यांचे 'ठाकरे चाय आणि स्नॅक्स' आणि अब्दु रोजिकचा 'बर्गीर' या ब्रँडचा समावेश आहे. शिराझी यांनी औषध व्यवसायातून या उद्योगांमध्ये पैसे गुंतवले. शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांना ही बाब कळताच त्यांनी शिराजी आणि त्यांच्या कंपनीसोबतचे करार रद्द केले.

ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिव ठाकरे यांनी 'हस्टलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड'चे संचालक कृणाल ओझा यांची भेट घेतली आणि त्यांनी शिव ठाकरेंना त्यांच्या व्यवसायात भागीदारी करण्याचा प्रस्ताव देखील दिला. या कंपनीने शिव ठाकरे यांच्या व्यवसायात चांगली रक्कम गुंतवली होती.

2023 मध्येच अब्दु रोजिकच्या फास्ट फूड ब्रँड 'बर्गीर'ने मुंबईत हॉटेल उघडले. हॉटेलच्या उद्घाटनाला सोनू सूद आणि इतर अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते.



हेही वाचा

'अनुपमा' अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन

BMC सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्ससाठी कर वाढवण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा